काचीगुडा -हिंगोली -नरखेड एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्यांसाठी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची

0
908

नांदेड- दीपावलीचा सण सुरू आहे आणि या सणानिमित्त प्रवासी मोठ्या प्रमाणात आपल्या आप्तस्वकीयांकडे,आपल्या घरांकडे जात असतात.महिला भगिनी भाऊबीज निमित्त माहेरी जातात.अशावेळी सर्वात स्वस्त आणि प्रवाशांचं आवडतं साधन म्हणजे रेल्वे(train) होय. मात्र अशा वेळी म्हणजेच दीपावली(Diwali) दरम्यान एखादी रेल्वे जर रद्द झाली तर प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो.

अशीच आज 25 ऑक्टोबर रोजी काचीगुडा (kachiguda)वाया हिंगोली ते नरखेड जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस(intercity express) ही रॅक अभावी रद्द करण्यात आली आहे. दिनांक 25-10-2022 ची  गाडी क्रमांक 17641 काचीगुडा ते नारखेर इंटर सिटी एक्सप्रेस रेकच्या अभावी रद्द करण्यात आली आहे.नांदेड रेल्वे विभागीय जनसंपर्क अधिकारी यांनी ही माहिती दिली आहे. रॅक नसल्यामुळे रद्द करण्यात आलेल्या या रेल्वेमुळे या रेल्वेद्वारे काचीगुडा ते कामा रेड्डी(kamareddy), निजामाबाद(nizamabad) नांदेड(nanded), पूर्णा(purna),वसमत(basmat), हिंगोली(hingoli),वाशिम(washim),अकोला(akola), अमरावती(amrawati), नरखेड(narkher)या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तरी प्रहार टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही सांगू इच्छितो की आपण या रेल्वे ची वाट न बघता पर्यायी मार्गाने आपण प्रवास करावा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा