बघा दीपावली निमित्त आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभू चे देखणे रूप

0
843

औंढा नागनाथ – महाराष्ट्रात असलेल्या पाच ज्योतिर्लिंगांपैकी हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथे नागनाथ प्रभू चे आठवे ज्योतिर्लिंग स्थापित आहे. संपूर्ण भारतभरातून नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी भाविक येतात .नागनाथ मंदिरात वर्षभर विविध सण उत्सव साजरे केले जातात .दीपावली सणानिमित्त नागनाथ ज्योतिर्लिंग येथे श्री नागनाथ प्रभूची सोमवारी (ता.२४) दिवाळीनिमित्त अलंकाराने पिंड सजवून पूजा करण्यात आली.यावेळी विविध अलंकार देवाला घालण्यात आले.

 

दरवर्षी दिवाळीच्या वेळी ही अलंकार पूजा केली जाते. त्यानंतर औंढा नागनाथ येथील ग्रामस्थासह इतर भाविक मंदिरात दर्शनाला येतात. मुख्य पुजारी यांनी नागनाथ देवाची पूजा केली. देवाच्या अलंकारामध्ये सोन्याचा गोफ, लक्ष्मीहार, पुतळ्याची माळ, सोन्याचे कानातील डूल, सेवन पीस सोन्याचे पिंपळपान, मोत्याचा हार या विविध सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. अलंकार घालून श्री नागनाथ प्रभूची पिंड सजवण्यात आली. यावेळी देवस्थानचे पुजारी तथा कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा