हिंगोली- सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण. या खगोलीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी असतात. ग्रहणाबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहे. मात्र ही घटना बघण्यासाठी अनेक नागरिक उत्सुक असतात.
2022 या वर्षातील दुसरे आणि शेवटचे आंशिक सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज होत झाले. मंगळवारी सकाळी 11 वाजून 28 मिनिटापासून सूर्यग्रहण सुरू झाले आणि संध्याकाळी 6 वाजून 33 मिनिटापर्यंत हे सूर्यग्रहण राहिले. पण भारतात हे ग्रहण 4 वाजून 49 मिनिटापासून दिसायला सुरुवात (स्पर्श) झाली आणि 5 वाजून 26 मिनिटांपर्यंत राहिले. भारतात ग्रहणाचा मोक्ष काळ सूर्यास्तानंतरच आहे. राज्यभरात विविध भागातून आज नागरिकांमध्ये हे सूर्यग्रहण पाहण्याची उत्सुकता पाहायला मिळाली.
नागरिकांनी या सूर्यग्रहणाला मोठ्या उत्कंठेने बघितले. खंडग्रास सूर्यग्रहण जरी असला तरीही नागरिक विद्यार्थी याची आतुरतेने वाट बघत होते.
मात्र अनेक नागरिक विद्यार्थी असे होते की ज्यांना हे सूर्यग्रहण बघता आले नाही .अशाच लोकांसाठी आम्ही खास सूर्यग्रहणाचे वेगवेगळे दृश्य आपल्यासाठी घेऊन आलो आहोत .ज्यांनी हे सूर्यग्रहण बघण्याचे मिस केले त्यांनी आमच्या माध्यमातून हे सूर्यग्रहण बघावे. या सूर्यग्रहणाचे दृश्य आपल्या कॅमेरात टिपले आहे हिंगोली येथील प्रसिद्ध छायाचित्रकार संदीप बोरकर यांनी.