पप्पू चव्हाण गोळीबार प्रकरणी पोलीस कर्मचारी जयप्रकाश सदाशिव झाडे निलंबित

0
1827

हिंगोली -(प्रतिनिधी) हिंगोली शहरातील जिल्हा परिषद परिसरात एक ऑगस्ट रोजी भाजयुमो चे जिल्हा अध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात पप्पू चव्हाण हे जखमी झाले .या गोळीबाराने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये विरोधात गुन्हा दाखल केला.या प्रकरणी पोलिसांची कारवाई सुरु आहे.
या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांच्या तपासात अशी माहिती समोर आली आहे की दोन महिन्यापूर्वी पो शि /133 जयप्रकाश सदाशिव झाडे नेमणूक बी डी डी एस हिंगोली यांच्या नात्यातील एका मुलीचे गोळीबार प्रकरणातील आरोपी अक्षय इंदोरिया सोबत प्रेम प्रकरण होते. या प्रकरणावरून पप्पू चव्हाण यांनी आरोपी अक्षय इंदूरिया व ओम पवार यांना दोघांना बेदम मारहाण करून जखमी केले होते.त्यावेळी हे सर्व प्रकरण जयप्रकाश झाडे यांच्या समक्ष घडले होते. परंतु या प्रकरणाची माहिती जयप्रकाश झाडे यांनी वरिष्ठांना देणे गरजेचे होते किंवा त्यांच्या समक्ष दखलपात्र गंभीर गुन्हा घडत असताना थांबविण्याच्या प्रयत्न सुद्धा केला नाही व यात स्वतः गुन्हा दाखल केला नाही वास्तविक मु पो कायदा कलम 64 प्रमाणे हे कायदेशीर बंधनकारक ड्युटी आहे. परंतु तसे काही केले नाही त्यामुळे त्या घटनेचा बदला घेण्यासाठी आरोपी अक्षय इंदोरिया व ओम पवार यांनी त्याच्या साथीदारासह पप्पू चव्हाण यांच्यावर एक ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद परिसरात गोळीबार करून जखमी केले.

पोलीस अधीक्षक यांनी काढलेल्या आदेशात पुढे नमूद केले आहे की “आपण दोन महिन्यापूर्वी घडलेल्या सदर गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना दिली असती किंवा स्वतः कायदेशीर कार्यवाही केली असती तर पप्पू चव्हाण यांच्यावर कायदेशीर कार्यवाही झाली असती व गोळीबार प्रकरणाचा गुन्हा घडला नसता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसता त्यामुळे जयप्रकाश झाडे हे मुका 64 मध्ये सांगितले कर्तव्य पार पाडलेले नाही त्यामुळे वरील गुन्हा घडलेला आहे म्हणून कसूर केला आहे.”
याप्रकरणी धडक कारवाई करत हिंगोली पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पोलीस कर्मचारी जयप्रकाश जयप्रकाश सदाशिव झाडे यांना दोन ऑगस्ट रोजी शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा आदेश काढलेला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा