वकिलाला केलेल्या मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांची तडका फडकी बदली: पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांची मोठी कारवाई

0
1217

हिंगोली (प्रतिनिधी)- एका प्रकरणात कलमनुरी पोलीस ठाण्यात गेलेले एडवोकेट केशव बनसोडे यांना कळमनुरी चे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे व इतर कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण करून इनकाऊंटरची धमकी दिल्याची सविस्तर तक्रार एडवोकेट केशव बनसोडे यांनी पोलीस अधीक्षक यांना दिली. याप्रकरणी एडवोकेट केशव बनसोडे यांनी 13-10-23 रोजी पोलीस अधीक्षक यांना तक्रार देऊन पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे व इतर कर्मचाऱ्यां विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी केली होती. याप्रकरणी हिंगोली वकील संघानेही 13-10-23 रोजी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यां विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी कर्तव्यात केलेल्या कसुरीवरून पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांची कळमनुरी पोलीस स्टेशन येथून पोलीस नियंत्रण कक्षात पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी तडकाफडकी बदली करण्याचे आदेश 16-10-23 रोजी काढले.

वैजनाथ मुंडे वर गुन्हा दाखल करावा- ऍड केशव बनसोडे
पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे व इतर कर्मचाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करून कायमस्वरूपी निलंबित करावे अशी मागणी एडवोकेट केशव बनसोडे यांनी केली आहे. मला न्याय मिळेपर्यंत हा लढा मी कायदेशीरपणे चालूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया एडवोकेट केशव बनसोडे यांनी प्रहार टीव्ही शी बोलताना दिली.

पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे व इतर दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा –
पी. के. पुरी ज्येष्ठविधीज्ञ
पोलिस सदरक्षणाय खलनिग्रहणाय करण्याऐवजी खलरक्षणाय सदनिग्रहणाय करताना दिसत आहेत. एडवोकेट केशव बनसोडे यांना केलेल्या मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे व इतर दोषी कर्मचारी विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी प्रतिक्रिया प्रहार टीव्ही शी बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ पी.के.पुरी यांनी दिली.

आता या प्रकरणी वैजनाथ मुंडे यांच्यावर पोलीस गुन्हा दाखल करतात की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा