मुसळधार पावसामुळे ब्रिटिशकालीन पूल कोसळला

0
188

औंढा नागनाथ- हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ वसमत रस्त्यावर चोंडी शहापूर येथे ओढ्यावर बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल मुसळधार पावसामुळे कोसळला आहे. औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यामध्ये पहाटे तीन वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आला आणि पुलाचा आधार असलेला भाग कोसळला.

त्यामुळे काही काळात पुल पूर्णपणे जमीनदोस झाला.पूल कोसळल्यामुळे दोन्ही कडची वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत .घटनास्थळी महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. दरम्यान लवकरात लवकर हा पूल बांधावा जेणेकरून या महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल अशी मागणी प्रवासी ,वाहनचालक करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा