चोवीस तासातच हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्या नियुक्तीच्या आदेशात बदल जी श्रीधर होणार हिंगोली चे पोलीस अधीक्षक?

0
221

हिंगोली – 20 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात दीपावली पूर्व 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले होते. यामध्ये हिंगोली पोलीस अधीक्षक पदी संदीप सिंग गील यांची नियुक्ती करण्यात आली. संदीप सिंग गिल यांना एम राकेश कलासागर यांच्या जागी त्यांना नियुक्ती देण्यात आली. मात्र 24 तासातच त्या आदेशात अंशतः बदल करत संदीप सिंग गिल  यांच्या ऐवजी आता जी श्रीधर यांचे हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने असा आदेश काढण्यात आला आहे. आता जी श्रीधर हे हिंगोलीत रुजू होतात किंवा परत एक नवीन आदेश निघतो याबद्दल आता चर्चेला उधाण आलं आहे.

जी श्रीधर यांच्यासोबतच सिंधुदुर्ग चे पोलीस अधीक्षक  पवन बनसोड यांच्या यवतमाळ पोलीस अधीक्षक नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा