महाराष्ट्रात दीपावली पूर्वी पोलिस भागात मोठे खांदेपलट, हिंगोली पोलीस अधीक्षक पदी संदीप सिंग गिल यांची नियुक्ती

0
330

मुंबई- महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने दीपावली पूर्वी पोलिस विभागात

मोठ्या प्रमाणावर खांदे पालट केले आहे. 20 ऑक्टोबर रोजी व्यंकटेश भट शासनाचे सहसचिव यांच्या सहीने निघालेल्या आदेशात राज्यातील तब्बल 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघालेले आहेत.

हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक पदी हिंगोली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 चे समादेशक संदीप सिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोली चे विद्यमान पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या जागी संदीप सिंग हे पदभार स्वीकारणार आहेत.

संदीप सिंग गिल यांनी राज्य राखीव पोलीस दलात समादेशक पदी काम करत असताना अनेक विकास कामे केली आहेत. एक उत्तम अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे आता हिंगोली पोलीस अधीक्षक पदी काम करत असताना अनेक योजना ते राबवू शकतात.

नांदेडच्या पोलीस अधीक्षक पदी प्रमोद कुमार शेवाळे यांचे जागी श्रीकृष्ण कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर परभणीच्या पोलीस अधीक्षक पदी श्रीमती राग सुधा आर यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा