नरसी नामदेव – संत शिरोमणी भक्त नामदेव महाराज यांच्या 752 व्या जन्म शताब्दी निमित्त 2 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2022 दरम्यान 8 वी नांदेड ते अमृतसर “घुमान दर्शन यात्रा” आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा गुरुवारी 20 ऑक्टोबर रोजी नरसी येथील नामदेव मंदिरात नारळ फोडून करण्यात आला.
नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे,संभाजी धुळगंडे,सतिश देशमुख तरोडेकर ,सुभाष बलेवार,तुलसीदास भुसेवार, मोतिभाऊ केंद्रे,विनायक पाथरकर,तुकाराम कोटूरवार,प्, जनार्धनराव पिन्नलवार,दिपक मठपती, श्रेयसकुमार बोकारे,धनंजय उमरीकर,मधुकर कारेगावकर,गोपाल पेंडकर, पुंडलिक बेलकर शिवाजी कराळे,,सुरेश मुंडे, रामराम मिजगर, ,महाजन उप्पलवाड, ,दिलिप अंगुलवार, पांडुरंग चव्हाण, बजरंग पुरी, उत्तमराव देशमुख हे यावेळी उपस्थित होते. नामदेव मंदिरात पूजा करण्यात आली.
घुमान यात्रा एक सामाजिक आध्यत्मिक चळवळ असून संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणे या सोबतच पंजाब आणि महाराष्ट्रात बंधू भाव जागृत करून सांस्कृतिक देवाण घेवाण करणे हा या चळवळीचा मुख्य हेतू आहे.. दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.. महाराष्ट्र व इतर प्रांतातील भक्त जण मोठया संख्येने सहभागी होतात..
संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी ‘तीर्थक्षेत्र घुमान’ – ‘सुवर्ण मंदिर’ अमृतसर – शक्ती पीठ ‘माता नैना देवी’ – शक्तीपीठ माता ज्वाला देवी (हिमाचल प्रदेश) – ‘आनंदपूर साहिब’ (तख्त) – आशिया खंडातील सर्वात उंच आणि भव्य ‘भाकरा नांगल’ धरण – पंजाबच्या संस्कृतीचा अंखो देखा इतिहास असलेले ‘विरास्ते ‘खालसा मुजियम’ – सुल्तानपूर लोधी- गोविंदवाल साहिब -परजिया कलान-‘कार्तिकी स्वामी’ – वाघा ‘अटारी’ बॉर्डर – ‘जालियनवाला’ बाग – बस्सी पठाणा – फतेगड साहिब – पानिपत – कुरुक्षेत्र – दिल्ली असे भ्रमण आणि दर्शन घडवते..
ता. 2 नोव्हेंबर रोजी यात्रा 12421 स्पेशल अमृतसर एक्सप्रेस ने नांदेड येथून निघणार असून हिंगोली ,अकोला मार्गे पंजाब कडे मार्गस्थ होणार आहे, 300 भाविक भक्त यात्रेत सहभागी आहेत.