पी एफ आय च पाकिस्तान कनेक्शन

0
283

नवी दिल्ली (ब्युरो रिपोर्ट) – भारतामध्ये देश विघातक कारवाया करणाऱ्या पीएसआय वर काही दिवसांपूर्वी संपूर्ण भारतात राष्ट्रीय तपास यंत्रणा सह इतर यंत्रणांनी छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये पी एफ आय च्या कार्यालयावर आक्षेपार्ह  साहित्य मिळाले होते. पी एफ आय च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने पाच वर्षासाठी बंदी घातली. इतके दिवस पीएफ आय अत्यंत छुप्या पद्धतीने देश विघातक कारवाया करत होते.

 पी एफ आय वर कारवाई करताच अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.
 पीएफआय च्या कार्यकर्त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.पी एफ आय सदस्यांचे अनेक व्हाट्सअप ग्रुप आहे. विशेष म्हणजे ग्रुपचा एक एडमिन पाकिस्तानचा असल्याचं समोर आलं आहे.एटीएस ने केलेल्या चौकशीत अनेक खुलासे झाले आहेत. त्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आणखीन 175 सदस्य होते त्यापैकी बरेच जण अफगाणिस्तान आणि युएई चे होते.अनेक सदस्यांनी परदेशात प्रवास करून परदेशात अनेक व्यवहार केले होते. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे पी एफ आय आणि त्याच्याशी संलग्न संघटनांवर पाच वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. एटीएस आणि ईडीने मोठी देशव्यापी कारवाई केली होती

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा