पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांचा करवाई चा धड़ाका,सात जणांना केले दोन वर्षासाठी हद्दपार

0
674

हिंगोली – हिंगोली नुतन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षकाचा पदभार स्वीकारून एका महिन्याचा कालावधी देखील उलटला नाही. यामध्येच त्यांनी अवैध धंदे आणि अवैध धंदे करणारे,सराईत गुन्हेगार तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.

पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी कळमनुरी शहरात राहणारे सराईत गुन्हेगार शेख अखिल उर्फ फावडा शेख शब्बीर , शेख जमीर शेख खलाल, शेख आरेफ शेख खलील,शेख आसेफ शेख खलील,अतिख खान वलदियाखां पठाण,शेख समीर उर्फ टोबो शेख खलील,मोईन नाईक मतीन नाईक यांचे विरुद्ध कळमनुरी पोलीस स्टेशन येथे मालमत्तेचे व शरीराविरुद्ध चे १४ गुन्हे दाखल असुन नमूद इसम वेळोवेळी प्रतिबंधात्मक करून हि त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा न करता सतत संघटितपणे गुन्हे करतच आहेत. त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालींमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास तसेच संपत्तीस धोका होत असल्याने त्यांना पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये सात आरोपींना दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातुन हद्दपार केल्याचे आदेश काढले आहे. याबाबत ची माहिती जनसंपर्क अधिकारी,पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी प्रेसनोट द्वारे कळवली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा