हिंगोली- हिंगोली चे नूतन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना हिंगोली पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेऊन एक महिना ही उलटला नाहीये या एका महिन्यातच त्यांनी पोलीस प्रशासनामध्ये कडक धोरण अवलंबून मोठ्या सुधारणा केल्या आहेत. एकीकडे त्यांनी पोलिसांचं मनोधैर्य वाढावे म्हणून विविध बक्षीस योजना सुरू केली आहे. तर दुसरीकडे कामचुकारपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी विरोधात कारवाईचे संकेत दिले आहे. अवैध धंद्यांविरोधात जी श्रीधर यांनी अतिशय कडक भूमिका घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.यामुळेच जिल्ह्यात सर्वत्र अवैधधंद्याविरोधात कारवाई केली जात आहे. पदभार स्वीकारल्याच्या एका महिन्याच्या आतच आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत एका विरोधात एमपीडिए ची कारवाई करण्यात आली आहे. गावठी हातभट्टीदारू चे सतत गुन्हे करणाऱ्या ला एम पी डी ए अंतर्गत कारवाई करत एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आहे. संदीप गोविंद पवार राहणार येहळेगाव तुकाराम हा सवयीचा हातभट्टी वाला म्हणून सिद्ध करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरेल अशा प्रकारची कृत्ये करीत आहे व तो एमपीडिए कायद्यानुसार हातभट्टी वाला बनला आहे. म्हणून त्याला एम पी डी ए कायदा 1981 अन्वये एका वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश काढण्यात आले.
जी श्रीधर यांच्या या धडक कार्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.