बीसीसीआय या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती .अखेर रॉजर बिन्नी भारताचे भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू यांची निवड बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध करण्यात आली १९८३ साली देशाला पहिला क्रिकेट विश्वचषक मिळवून देणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य असलेल्या तसेच सध्या कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असलेल्या माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सौरव गांगुली यांच्याकडे आतापर्यंत या पदाची सूत्रे होती परंतू नव्याने घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेसाठी केवळ रॉजर बिन्नी यांचे नामांकन प्राप्त झाले होते, त्यामुळे त्यांची बिनविरोध अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रॉजर बिन्नी हे अनेक वर्षांचा क्रिकेटचा अनुभव असलेले माजी खेळाडू असून सध्या त्यांच्याकडे कर्नाटक सारख्या महत्वपूर्ण क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद होते. रॉजर बिन्नी यांचे पुत्र स्टुअर्ट बिन्नी देखील भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य राहिले असून अनेकदा अंतिम अकरा खेळाडू मध्ये त्यांना स्थान प्राप्त झाले होते. या निवडीमुळे रॉजर बिन्नी बीसीसीआयचे ३६ वे अध्यक्ष बनले आहे.