हिंगोली (प्रतिनिधी)- हिंगोली शहरातील रामलीला मैदान वर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज आयोजित करण्यात आली आहे . शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात,माजी आमदार संतोष टार्फे, हिंगोली जिल्हा सहसंपर्कप्रमुख गोपू पाटील जिल्हा संघटक बाळासाहेब मगर व इतर पदाधिकारी हिंगोली जिल्ह्यात सर्कल निहाय बैठका घेऊन नागरिकांना सभेत उपस्थित राहण्याचा निमंत्रण देत आहे. एकीकडे शिवसेनेचे संपर्कप्रमुख संपर्कप्रमुख जिल्हा संघटक जिल्हाप्रमुख हे सभेसाठी गर्दी कशी जमा होईल यासाठी प्रयत्न करत आहे.दुसरीकडे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक शिवसेनेला रामराम करून शिवसेनेच्या शिंदे गटात सामील होत आहेत. लाख येथील अनेक शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले आहे याचं कारण काय इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे संपर्कप्रमुख व इतर पदाधिकारी जिल्हाभर फिरत आहेत तर दुसरीकडे शिंदे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ला सुरुंग लावा त्यांचेच शिवसैनिक पळवत आहे असे चित्र निर्माण झाला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी गर्दी जमा होण्याऐवजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चे शिवसैनिक जर शिंदे कटात सामील होत असतील तर हा शिवसेना (युबीटी)गटाच्या शिवसेना पदाधिकारी यांना खूप मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेला बांधून ठेवून त्यांना सोबत घेऊन कार्य करण्याची जबाबदारी शिवसेना पदाधिकाऱ्यांची असते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पूर्वसंध्येलाच जर शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या सभेला उपस्थित राहण्याऐवजी शिंदे गटात प्रवेश करत असतील तर नक्कीच ही एक विचारणीय बाब आहे.आता याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पदाधिकारी कोणत्या दृष्टीने बघतील हे पाहावे लागेल.