हिंगोली येथे 167 वर्षाची परंपरा असलेला दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . दसऱ्याच्या दिवशी 51 फुटी रावण आणि मेघना पुतळ्याचे दहन केले जाते .मात्र दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करता वेळेस मुसळधार पाऊस पडल्यामुळे एकच गोंधळ उडाला.धो धो पाऊस पडल्यामुळे नागरिक,आयोजन समिती यांची तारांबळ उडाली. रावण दहन कसं करणार असा अनेकांना प्रश्न पडला .अखेर पडत्या पावसात रावणाचे दहन करण्यात आले