दसरा म्हणजेच असत्यावर वर सत्याचा विजय आजच्याच दिवशी भगवान रामाने रावण चा वध करून पृथ्वीतलावर धर्माची स्थापना केली होती.आई दुर्गा ने महिषासुर चा वध करून पृथ्वी ला राक्षसांपासून संरक्षण दिले होते म्हणुन आज विजयादशमी असते. दसरा आणि विजयादशमी चा संगम म्हणजे हिंदू धर्मीयांसाठी एक पर्वणीच असते. वर्षातील साढे तीन मुहूर्तापैकी एक म्हणजे दसरा. जगभरातील हिंदूंसाठी अत्यंत पवित्र दिवस असतो .भारतातच जगभरात अनेक ठिकाणी दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .
हिंगोलीचा दसरा हा भारतात दुसर्या क्रमांकाचा ऐतिहासिक दसरा म्हणून ओळखला जातो. या दसरा महोत्सवाला यंदा १६७ वर्ष सुरू आहे. या दसर्याच वैशिष्ट्ये म्हणजे हा दसरा लोकसहभागातून साजरा केला जातो. या महोत्सवात असलेली प्रदर्शनी म्हणजे भाविकांसाठी खरेदीची मनोरंजनाची पर्वणीच असते
हिंगोलीचा दसरा भारतात कुल्लू आणि म्हेसुर नंतरचा दुसर्या क्रमांकाचा दसरा मानला जातो. संत मानदास महाराजांनी धार्मिक प्रबोधनासाठी सुरु केलेला हा दसरा भाविकांसाठी एक पर्वणीच असतो . वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवणारे व्यापारी हिंगोली येथे येत असत. १६७ वर्षा पूर्वी म्हणजेच १८५५ साली संत मानदास महाराज यांनी हिंगोलीत सार्वजनिक दसरा उत्सव साजरा करायला सुरवात केली.घटस्थापने पासूनच या दसर्याच मोठ आकर्षण असते. य़ेथे देशभरातून वेगवेगळ्या वस्तू विक्री करण्यासाठी व्यापारी येतात.मनोरंजन करणारे ,झुले,आकाशपाळणे,मोटार गाड्या, मौत का कुवा, असे खेळाचे साधने येत असतात.दसरा मध्ये खेळणा प्रोत्सहान मिळावे म्हणून अनेक देशी खेळांची स्पर्धा घेतली जाते .
हिंगोलीच्या दसऱ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे रामायणातील सर्वच पात्राच्या लाकूड आणि कागदाच्या देवी देवतांचे आकर्षक आशा मुखवटे व प्रतिकृती तयार केले जातात. या दसरा महोत्सवाचे सर्वात आकर्षणाचे विषय म्हणजे दहा दिवसाच्या दसरा महोत्सवा नंतर होणारे रावण दहन , या महोत्सवात दहा दिवस रामलीला नाटिका सादर केली जाते. त्या नाटिके मधील रावण वध होताच प्रतीकात्मक रावणाच्या पुतळ्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जोत पेटवून रावणाचे दहन केले जाते या रावण दहनासाठी तब्बल 51 फूट उंच रावणाची प्रतिकृती तयार करण्यात येते ,दसर्याच्या रात्री रामलीले मधील रावण दहनाच्या वेळी या रावनाच्या प्रतिकृती पुतळ्याचा दहन करण्यात येते . हे विहगम दृश्य बघण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून लोक, लाखोंच्या संख्येने गर्दी करीत असतात.