हिंगोली (प्रतिनिधी)- हिंगोली जिल्ह्यात जानेवारी महिन्यामध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली होती त्यामध्ये 21 जागेसाठी 219 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्या 219 उमेदवारांची लेखी परीक्षा दोन एप्रिल 2023 रोजी होणार आहे. 2 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता ही परीक्षा घेण्यात येणार असून पोलीस शिपाई पदासाठी हिंगोली घटकात लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र हे महा आयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करून घेण्यास उपलब्ध आहेत.
लेखी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर हजर येणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या वेळेपेक्षा दोन तास अगोदर पोहोचणे आवश्यक आहे .हिंगोली घटकासाठी लेखी परीक्षेचे आयोजन कम्युनिटी हाल नवीन पोलीस वसाहत नांदेड रोड हिंगोली या ठिकाणी करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे कळविले आहे.