एनसीसी दिनी छात्र सैनिकांचे रक्तदान

0
281

हिंगोली-
आदर्श महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने एनसीसी महानिर्देशालय दिल्ली , एनसीसी बटालियन नांदेड यांच्या आदेशान्वये एनसीसी दिनी रक्तदान शिबिर आदर्श महाविद्यालयात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विलास आघाव हे होते . प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय रक्तपेढीचे रामचंद्र दुधाळकर, बंडू नरवाडे, विवेक गिरी, संतोष ठाकरे, सतीश तडस ,प्रभाकर खिल्लारे हे उपस्थित होते.
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान करून राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या विद्यार्थ्यांनी आदर्श उदाहरण प्रस्तुत केलेले आहे. राष्ट्र निर्माण मध्ये राष्ट्रीय छात्र सेना च्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व राष्ट्रीय कार्याच्या भावना रुजविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. सामाजिक व राष्ट्रीय कार्यात आदर्श महाविद्यालयाचा एनसीसी विभाग सदैव अग्रेसर असल्याचा सार्थ अभिमान शहरवासीयांना आहे त्या जनभावनेतूनच शासकीय रक्तपेढीमध्ये गरजवंतांना रक्त मिळावे व तुटवडा कमी व्हावा याकरिता राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत एनसीसी दिन रक्त देऊन साजरा केला असे मनोगत प्र प्राचार्य डॉ. विलास आघाव यांनी व्यक्त केले.

रक्तदान शिबिरात राष्ट्रीय छात्र सेने सोबतच गावातील सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळी यांनी सुद्धा सहभाग नोंदविला. आज झालेल्या रक्तदान शिबिरात मेजर पंढरीनाथ घुगे, सिद्धार्थ खिल्लारे, वैभव वराडे, अनिल आढळकर, प्रशांत मिरगललु, गणेश खेत्रे,विशाल टेकाळे अनिल इंगळे, कांबळे रामभाऊ, शेख अलीम ,शिंदे गोपाल, कांबळे गजानन, पंकज जाधव,विशाल देशमुख, धीरज दिंडे, सदानंद पारवे, शेख अल्लबक्ष, अमोल थोरात, नितीन दिपके, आवेश रजक, माधव सपाटे, विकास पाईकराव, अभिजीत पवार, कांबळे प्रभाकर, अतुल मस्के, शुभम कांबळे या राष्ट्रीय छात्र सेनेच्या आजी-माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते, व हिंगोली शहरातील सुप्रसिद्ध मल्ल, खेळाडू यांनी रक्तदान केले. राष्ट्रीय छात्र सेनेची विद्यार्थिनी संध्या भगत हिने रक्तदान करत विद्यार्थिनी समोर आदर्श उदाहरण प्रस्तुत केले.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख मेजर पंढरीनाथ घुगे यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले तसेच समाजातील रक्तदानाबद्दल असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला . राष्ट्रीय छात्रसेना दिनी विद्यार्थ्यांनी रक्तदान करून केलेला कार्य अतुलनीय असून त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन करीत आपल्या भावना व्यक्त केल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनसीसी बटालियन नांदेड चे कमांडिंग ऑफिसर कर्नल यम रंगराव यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर पंढरीनाथ घुगे, नितीन दीपके, अमर पवार, चेतन कांबळे, अनिल इंगळे, शुभम कांबळे, शेख अलबक्ष, शेख अलबक्ष, प्रशांत, कुंडकर पवन ,घ्यार केदारलिंग, शेख इरफान लांबाडे उमेश कृष्णा साबळे, लेकूले अभिषेक,पंकज जाधव , गौरव घुगे, सोहेल नौरंगाबादी, संध्या भगत कु. तिवारी, सोनाली ढेंबरे ,राजनंदनी, पल्लवी फड आदी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा