माहिती अधिकार कायद्यासंदर्भात हिंगोली पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी घेतला हा “मोठा” निर्णय

0
567

हिंगोली – हिंगोली पोलीस पोलीस विभागात माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये प्राप्त होणारे अर्ज त्वरित निकाली काढण्यासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. दि. 31/10/2022 रोजी जी. श्रीधर पोलीस अधीक्षक यांच्या सहीने आदेश काढण्यात आले.
माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम पाच एक मध्ये प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांवर हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस उपअधीक्षक गृह हिंगोली यांना जन माहिती अधिकारी म्हणून व अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली यांना प्रथम आपेलीय अधिकारी म्हणून पदनिर्देशित करण्यात आले.
सर्व पोलीस स्टेशन शाखा प्रभारी अधिकारी कार्यालय अधीक्षक यांना सहाय्यक जन माहिती अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक गृह हिंगोली व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना जन्म माहिती अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक यांना प्रथम अपील अधिकारी म्हणून पद निर्देशित करण्यात आले.
पद निर्देशित केलेल्या जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलय अधिकारी यांची नावे अद्यावत करून घ्यावे ऑनलाइन पोस्टद्वारे प्रत्यक्षरीत्या आलेले अर्ज अर्जदार यांना दाखल केलेले जोडपत्र अ ब क व इतर वरिष्ठानकडून राज्य माहिती आयुक्त यांचे कडून प्राप्त व्यवहाराच्या नोंदीप्रमाणे रजिस्टर ला घेऊन त्याची कार्यालयीन प्रत अभिलेखावर अद्यावत ठेवतील संबंधित अर्ज जन्म यादी अधिकारी व प्रथम आपली अधिकारी यांचे कार्यालयास पुढील कार्यवाही स्थळ हस्तांतरण करतील तसेच प्रत्येक महिन्याला मासिक अहवाल सादर करतील असं आदेशात नमूद करण्यात आले आहे.
माहिती अधिकारात देण्यात येणारे अर्ज त्याची माहिती वेळेवर व पूर्णपणे भेटत नसल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जातात मात्र पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी जन माहिती अधिकारात देण्यात येणारे अर्ज त्वरित निकाली काढावे यासाठी हा आदेश काढला आहे या आदेशानंतर माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये प्रलंबित अर्ज निकाली निघतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा