किमान या मागणीसाठी तरी हिंगोली लोकसभा भाजपचे सर्व इच्छुक एकाजागी आले… काय मागणी केली यांनी?

0
128

मुंबई(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूक 2024 मध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होण्याचे वर्तवले जात आहे. मोदी गॅरंटी मुळे आपण पण खासदार होऊ शकतो अशी गॅरंटी असल्याच मत भाजप इच्छुक उमेदवारांचे झालेले आहे. यामुळे हिंगोली लोकसभा लढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अनेक इच्छुक रीघ लावून उभे आहेत. पण महायुतीमध्ये सध्या तरी ही जागा शिवसेना कडे असल्याने शिवसेना ही जागा सोडण्यास तयार नाही. विद्यमान खासदार हेमंत पाटील असल्यामुळे शिवसेना ही जागा भाजपला देईल याबाबत अनेक भाजप पदाधिकाऱ्यांना शंका आहे. यातच भाजपचे इच्छुक जे आतापर्यंत तिकीट मिळवण्यासाठी आपापल्या परीने स्वतःसाठी फिल्डिंग करताना दिसत आहे ते आता एकत्र आले आहेत.

हिंगोली लोकसभेची जागा भाजपला सोडावी या एका मागणीने सर्व इच्छुकांना एकत्र केले आहे .आतापर्यंत एकमेकांकडे दुर्लक्ष करणारे स्थानिक इच्छुक आता हातात हात देऊन लोकसभा भाजपलाच सोडवून घ्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे.यासाठी आमदार तानाजी मुटकुळे यांच्या सह माजी खासदार शिवाजी माने माजी आमदार गजानन घुगे श्रीकांत पाटील माजी आमदार रामराव वडकुते भाजप जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे रामदास पाटील सुमठाणकर कैलास काबरा पप्पू चव्हाण संतोष टेकाळे यासह अनेक पदाधिकारी या शिष्टमंडळात आहेत. आता भाजप श्रेष्ठी काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा