पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी इशारा देतात झाली धडक कारवाई,काळ्या बाजारात? जाणारं धान्याचं ट्रक पकडलं?

0
200

पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी इशारा देतात झाली धडक कारवाई,काळ्या बाजारात? जाणारं धान्याचं ट्रक पकडलं?

हिंगोली चे नूतन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी प्रहार टीव्ही ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अवैध धंदे करणाऱ्या, काळे धंदे करणाऱ्यांना थेट इशारा दिला होता. दोन नंबरचे धंदे खपवून घेणार नाही असा इशारा देऊनही काही लोक त्यांचा काळा कारभार चालू ठेवत आहे. मात्र अशा लोकांवर पोलीस अधीक्षकांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.२९ ऑक्टॉबर च्या रात्री वसमत येथे रेशन धान्याचे ट्रक काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना मिळताच त्यांनी तात्काळ वसमत पोलिसांना सदर प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस अधीक्षकांचे आदेश येताच वसमत पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारा धान्याच ट्रक पकडून वसमत पोलीस स्टेशनला उभा केलं. MH 26 BE 7337 या क्रमांकाचा ट्रक पकडण्यात आला. या ट्रक मध्ये खरोखर काळ्या बाजारात जाणारं रेशन च धान्य आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत.ट्रक मध्ये शेकडो क्विंटल धान्य असल्याचं समजतं. बातमी लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात राशन चे धान्य काळ्या बाजारात विक्रीला जाते.आता पोलीस अधीक्षक यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात कारवाई चा बडगा उगारला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा