छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – श्री राजस्थानी विप्र महिला मंडळ तर्फे दरवर्षी समाजातील कर्तुत्ववान, संघर्ष योद्धा, होतकरू महिलांचा जाहीर सत्कार केला जातो. जीवनात विपरीत परिस्थितीवर मात करून जीवनातील संकटाचा सामना करत
पुढे जाणाऱ्या राजस्थानी विप्र समाजातील रणरागिणींचा मोठा थाटामाटात जंगी सत्कार केला जातो.
या वर्षी सुद्धा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री राजस्थानी विप्र महिला मंडळाने हा स्तुत्य उपक्रम राबवला. राज्यमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जीवनात संघर्ष करून विपरीत परिस्थिती चा सामना करत पुढे जाऊन जीवनात यश संपादन करणाऱ्या शांता नंदकिशोर शर्मा व इतर महिलांचा जंगी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राज्यमंत्री अतुल सावे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधुरीताई अदावंत गारखेडा मंडळ सरचिटणीस लक्ष्मीकांत थेटे यांची होती. या कार्यक्रमात अतुल सावे यांनी उपस्थिती दर्शवून कर्तृत्ववान महिलांना प्रोत्साहन दिले.यावेळी राज्यमंत्री अतुल सावे यांनी शांता शर्मा यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी श्री राजस्थानी महिला मंडळच्या अध्यक्ष संगीता संजय शर्मा यांनी केले तर हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारती जोशी ज्योती तिवारी विजया पंचारिया रमा शर्मा सारिका शर्मा उर्मिला पंडित ममता शर्मा श्रीकांता खंडेलवाल व इतर पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.