खबरदार ….जागते रहो… तुकाराम मुंढे कधीही येऊ शकतात

0
750

मुंबई – आपल्या धडाकेबाज कामाच्या पद्धतीमुळे भल्या भल्यांना घाम फोडणारे आयएएस तुकाराम मुंढे(Tukaram Mundhe) हे नेहमीच आपल्या कार्यशैलीमुळे चर्चेत असतात. मुंढे यांच्याकडे जो पदभार दिला जातो त्यात ते कामात कसूर करणाऱ्यावर कारवाई करत प्रशासनाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करतात.

सध्या त्यांच्याकडे आयुक्त(COMMISSIONER) आरोग्य सेवा तसेच संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान चा पदभार आहे. हा पदभार स्वीकारल्यापासून मुंढे यांनी त्यांच्या शैलीने(Style) कामाला सुरुवात केली आहे. एन दिवाळी (Diwali 2022)मध्ये मराठवाडा (Marathwada) दौरा करत असल्यामुळे आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. तुकाराम मुंढे हे आरोग्य विभाग किंवा रुग्णालयात केव्हाही भेट देऊन पाहणी करू शकतात अशी शक्यता आहे. म्हणून आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना जगता पहारा द्यावा लागणार. जे आपले काम व्यवस्थित करतात त्यांना काहीच अडचण नाही पण जे अधिकारी,वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी आपले कर्तव्य व्यवस्थित पणे   बजावत नाहीत त्यांची मात्र धांदल उडणार हे मात्र नक्की.

तुकाराम मुंढे रुग्णालयात भेट देऊन तिथले रिकॉर्ड (Record) तपासणी करू शकतात. रुग्णांना त्यांच्या अडचणी विचारू शकतात. अशावेळी जर रिकॉर्ड  व्यवस्थित आढळून आले नाही ,रुग्ण सुविधा व्यवस्थित आढळून आल्या नाही तर संबंधितांवॉर कारवाई होऊ शकते. आरोग्य विभागाला शिस्त लावण्याचा प्रयत्न तुकाराम मुंढे करत असून मुंढे यांच्या कारवाई मुळे   सर्व सामान्य नागरिक,रुग्ण मात्र जाम खुश आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा