राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले जोडो मारो आंदोलन

0
288

महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या नजरा लागलेला निकाल काल विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. शिवसेना पक्षांमध्ये बंडाळी झाल्यानंतर शिवसेनेत पडलेली उभी फुट यानंतर उद्भवलेला वाद हा संपूर्ण भारतात चर्चेचा विषय बनला. आमदारांच्या अपात्रतेबद्दल चा निर्णय सभापती राहुल नार्वेकर यांनी काल जाहीर केला. यामध्ये उद्धव ठाकरे यांना धक्का बसला असून एकनाथ शिंदे व भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात हिंगोली मध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे.



हिंगोली शहरातील गांधी चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे पाटील यांनी कार्यकर्त्यांसह राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन केले. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची प्रतिमा जाळण्यात आली. यावेळी प्रचंड घोषणाबाजी शिवसेना कार्यकर्त्यांकडून राहुल नार्वेकर यांचे विरोधात करण्यात आली. राहुल नार्वेकर हे मोदी शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप विनायक भिसे पाटील यांनी केला.यावेळी विनायकरावजी भिसे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख,हिंगोली, उद्धवराव गायकवाड विधानसभा संघटक,परमेश्वर मांडगे उपजिल्हाप्रमुख,रमेश शिंदे जिल्हा संघटक,भानुदासराव जाधव तालुकाप्रमुख,आनंदराव जगताप तालुकाप्रमुख,विठ्ठल चोतमाल जि.प.स,शिवाजीराव सरकटे उपतालुकाप्रमुख,बाळू पाटील, लिंबाजी पठाडे,शिवाजीराव कराळे सर्कल प्रमुख,प्रवीण भाऊ जाधव शहर प्रमुख हिंगोली,आसिफ पठाण ज्ञानेश्वर सोनवणे,अतिक शेख,व तमाम निष्ठावंत शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा