महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. या आधीच फिक्स असल्याचा आरोप करत राहुल नार्वेकर यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला आहे .हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून शेण खाऊ घालण्यात आले. राहुल नार्वेकर यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.निकाल हा संविधानाने धरून नाही तर एकतर्फी व पक्षपाती लावण्यात आल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केलेला आहे. निकाल जरी आमच्या विरोधात असला तरीही जनता ही आमच्या सोबत असल्याचे प्रतिपादन जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केले.