हिंगोली (प्रतिनिधी)- हिंगोली पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस शिपाई इमरान खान बाबू खान पठाण बक्कल नंबर 460 यांना पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करणे चांगलेच भावले असून इम्रान खान ला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिले आहे.
अर्जदार हिंगोली येथील रहिवासी इमरान खान पठाण यांची पहिली पत्नी यांनी दिनांक 29-08 -2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज दिला की इम्रान खान पठाण यांनी पहिली पत्नी ही जिवंत असताना लातूर येथील महिलेशी दुसरा विवाह केला. याबाबतचे सर्व कागदपत्र तपास करून चौकशी करण्यात आली .यामध्ये इमरान खान पठाण यांनी पहिली पत्नी हयात असताना लातूरच्या एका महिलेसोबत दुसरा विवाह केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस नियमावली भाग -1 मधील नियम क्रमांक 414 (2)अन्वये कस्तुरी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे महाराष्ट्र पोलीस (शिक्षा व अपील )नियम 1956 मधील नियम क्र 03 अन्वये तसेच मुंबई पोलिस अधिनियम 1951 मधील नियम 25 अन्वये प्राप्त अधिकारान्वये इमरान खान पठाण यांना शिक्षेस पात्र ठरवण्यात आले.
इमरान खानच्या पहिल्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून प्राथमिक चौकशी,विभागीय चौकशी करण्यात आली यामध्ये इमरान खान पठाण हे दोषी सिद्ध झाले. त्यामुळे इमरान खान पठाण यांना शासकीय सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस दिनांक 17-11-2023 रोजी देण्यात आली. या नोटीसला उत्तर म्हणून इमरान खान पठाण यांनी दिलेला खुलासा व कथन समाधानकारक दिसून न आल्याने इमरान खान पठाण यांना पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिनांक 04- 12- 23 रोजी दिलेल्या आदेशात शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची शिक्षा देण्यात आली.