गजानन प्रल्हाद राठोड परत होणार पोलीस वाहन चालक… पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांची धडाकेबाज कारवाई

0
620

हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेला पोलीस नायक गजानन प्रल्हाद राठोड बक्कल नंबर ८२८ याची २००७ या वर्षात हिंगोली पोलीस खात्यात चालक या पदावर निवड करण्यात आली होती.२०१२ वर्षी गजानन प्रल्हाद राठोड याने केलेल्या वाहनाच्या अपघातामुळे त्याचे पोलीस खात्यातुन दिनांक ०९-०७-२०१२ रोजी निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर दिनांक १९-०९-२०१२ रोजी गजानन प्रल्हाद राठोड ला निलंबनातून मुक्त करून पोलीस मुख्यालय हिंगोली येथे कर्तव्य बजावणे कामी आदेश निर्गमित करण्यात आले होते.
३०-०५-२०१८ रोजी गजानन प्रल्हाद राठोड ची पोलीस मुख्यालय येथून वसमत शहर येथे बदली करण्यात आली.त्यानंतर लगेच दिनांक ०५-०६-१८ रोजी पोलीस मुख्यालय ते पोस्टे वसमत शहर बदलीसाठी एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली.तर दिनांक १४-०६-१९ रोजी पोस्टे वसमत शहर येथून शहर वाहतूक शाखा हिंगोली येथे विनंतीवरून बदली करण्यात आली.

वास्तविक पाहता पोना/८२८ गजानन प्रल्हाद राठोड यांची चालक पोलीस शिपाई या पदावर पोलीस भरती झाली आहे .परंतु नियमबाह्य व बेकायदेशीरपणे सदर चा कर्मचारी २०१२ पासून ते आज पर्यंत कार्यकारी पदावर ड्युटी करत आहे .सामान्यपणे कोणत्याही चालक पोलीस कर्मचारी यास कार्यकारी पदावर नियुक्ती करावयाचे असल्यास संबंधित पोलीस कर्मचारी हा वैद्यकीय सक्षम नसल्यास वैद्यकीय मंडळाचा अहवाल घेऊन कार्यकारी पदावर नियुक्ती करण्यात येते . मात्र पो. ना. /828 गजानन प्रल्हाद राठोड यांचे कडून असा कुठलाही प्रकारचा कागदपत्र/अहवाल वैद्यकीय मंडळाकडून घेण्यात आलेला नाही . अशा आशयाची तक्रार पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांनी पोलीस अधीक्षक हिंगोली यांना दिनांक २६-०७-२०२३ रोजी करून पो. ना. /828 गजानन प्रल्हाद राठोड यांना चालक पूर्व पदावर नेमावे अशी मागणी केली. पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत हिंगोली चे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे.दिनांक ०३-११-२०२३ रोजी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी आदेश काढत चापोना/८२८ गजानन प्रल्हाद राठोड सध्या नेमणूक शहर वाहतूक शाखा हिंगोली याला पुढील कर्तव्य बजावणे कामी मोटर परिवहन विभाग पोलीस मुख्यालय हिंगोली येथे त्याच्या कर्तव्याच्या मुळ ठिकाणी परत करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले.

पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा हिंगोली यांनी चापोना/८२८ गजानन प्रल्हाद राठोड याला पुढील कर्तव्य बजावणे कामे तात्काळ मोटार परिवहन विभाग पोलीस मुख्यालय हिंगोली येथे कार्यमुक्त करून तसा अनुपालन अहवाल या कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले आहे .
पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी गजानन प्रल्हाद राठोड वर केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे पोलीस अधीक्षक जी श्रीधर इतर गुन्हेगार सोबतच पोलीस खात्यातील गैरकारभार करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यावर सुद्धा त्याच तत्परतेने कारवाई करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे .

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा