(हिमायतनगर प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या जीवनाचे बलिदान करणारे हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील सुदर्शन देवराये यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन डॉ. श्रीकांत पाटील चंद्रवंशी यांनी त्यांच्या मुलीचे ईश्वरी चे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असा शब्द दिला.भाजप चे नेते डॉ श्रीकांत पाटील यांनी बुधवारी देवराये कुटुंबीयांची भेट घेतली, यावेळी सुदर्शन यांच्या पत्नीशी संवाद साधला असता ” मुलीला डॉक्टर बनवायचे सुदर्शन देवराये यांचे स्वप्न होते ” असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी भाऊ या नात्याने मुलीच्या शिक्षणासाठी सर्वप्रकारची सामाजिक व आर्थिक मदत करणार व त्यांच्या मुलीला डॉक्टर बनविणार असा शब्द डॉ श्रीकांत पाटील यांनी देवराये यांच्या पत्नीला दिला. सुदर्शन देवराये यांच्या परिवाराच्या गावकऱ्यांच्या दुःखात ते सहभागी झाले.
कामारी येथे उपोषण स्थळी डॉ. श्रीकांत पाटील यांनी सर्वाना रोजगार व कौशल्य विकास या मुद्द्यांवर सर्वांशी चर्चा केली व उपोषण करण्यामागे असणाऱ्या सर्वात मोठ्या करणावरच्या(बेरोजगारी) निदानांवर भाष्य करून सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. क्षमता निर्माण व इंडस्ट्रीज, MIDC च्या माध्यमातून हजारो युवकांच्या हाताला काम देण्याच्या त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळेल अशी भावना भावना गावकर्यांनी व्यक्त केली.
सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी विविध ठिकाणी उपोषण सुरु आहे त्यातच कामारी येथील सुदर्शन देवराये या युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घरात दोन चिमुकले, आई अर्धांगवायू झालेले वडील सोडून आपले जीवन संपविले. याच मागणीच्या पूर्ततेसाठी कामारी येथे मराठा समाज बांधवांचे देखील उपोषण सुरू आहे. घट्नेउपरांत अनेक नेत्यांनी देवराये कुटुंबाला भेट दिली व आर्थिक मदतीसाठी हाथ पुढे केला.परंतु हि आर्थिक मदत काही महिन्यात व एक-दोन वर्षात संपेल व पुन्हा परिवारावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये या दूरदृष्टीने डॉ श्रीकांत पाटील चंद्रवंशी यांनी स्वाभिमान बाळगणाऱ्या देवराये कुटुंबियांना त्यांच्या “युवा विकास फाउंडेशन” तर्फे आजीवन 10 हजार रुपये दर महिन्याला बहिणीस ओवाळणी म्हणून आर्थिक मदत देणार असे आव्हाहन केले.