हिंगोली( प्रतिनिधी).
श्रीमदभगवद्गीता हे वैदिक ज्ञानाचा सार असून विश्व कल्याणाचा मूलमंत्र आहे हा अंगिकारल्यास ह्या भूतलावरील सर्वच सुखी होतील त्यामुळे हे ज्ञांनामृत सर्वांनी प्राशन करून इस्कॉन ची तत्व प्रणाली अंगीकारणे ही काळाची गरज आहे,असे उद्गार वृंदावन येथील श्री कृष्ण बलराम मंदिराचे श्रीमान देवानंद प्रभू पंडित ह्यांनी काढले १० सप्टेंबर रोजी इस्कॉन च्या हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने जन्माश्टमी निमित्त संकीर्तन,महाभिषेक,श्री कृष्ण जन्मोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम,महाआरती आणि महाप्रसाद आदींचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस श्रीमान देवानंद प्रभू पंडित प्रमुख वक्ता आणि मार्गदर्शक म्हणून बोलत होते.मानवी जीवनाचं लक्ष काय, कस, आणि भगवंता प्रती अंतरात्मा पासून समर्पित करून घेण्यासाठी श्री कृष्ण भक्तीचा मार्ग च एकमेव असल्याचं त्यांनी सांगितलं हिंगोली इस्कॉन शाखेच्या माध्यामातून अल्पावधीतच वातावरण भक्तिमय झाल्याने भगवंत भक्तित सर्व थरातील,वयोगटातील मंडळी गुंतली आहेत त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आहे.
जगभरात इस्कॉन आणि भगवदगीता प्रचार आणि प्रसार पवित्र हेतूने सुरू असून जगातील सर्व भाषेतून भगवदगीता उपलब्ध असल्याने विश्र्वकल्यानाच सेवा कार्य जोमाने सुरू आहे त्यात हिंगोली जिल्हाच वातावरण उत्साही झालं आहे अस ही देवानंद प्रभू पंडित म्हणाले.याप्रसंगी स्वागतपर प्रास्ताविकातून सुनील गुंडेवार ह्यांनी आयोजनाच्या बाबत माहिती देवून वातावरण भक्तिमय करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.पियूष अगरवाल ह्यांनी सांस्कृतिक कार्य क्रमाच संचालन करताना चिमुकल्या पासून ते तरुण कलावंतांनी विविध कलागुणांचे सादरीकरण अभूतपूर्व असल्याचं सांगितलं व सर्व स्पर्धक आणि विजेत्यांना देवानंद प्रभू पंडित, विलास शिंनगारे प्रभूजि, विठ्लचंद्रदास प्रभुजी, तोषणीवाल प्रभुजी,आणि सुरभी देढे माताजिंच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आल.ह्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा भगवदगीता उपरणे श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.ह्यात ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय निलावार,पत्रकार कन्हैया खंडेलवाल,पत्रकार राजेंद्र हलवाई बालरोगतज्ज्ञ डॉ.चौधरी व डॉ.दमकोंडवार,डॉ.व्यवहारे,डॉ.गुंडेवार, विठ्ठल सोळंके,शिक्षण संस्था चालक तुकाराम पाटील,मुंबई चे अभय गोपालदास ,ब्रिजेश कृष्ण प्रभू ,संगीत साथी सुजित मंनवर,गणेश ठोके आदींचा समावेश होता.श्री राणी सती मंदिर ट्रस्ट च्या भव्य दिव्य मंदिरात सदरील कार्यक्रम संपन्न करण्यात इस्कॉन हिंगोली जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी सदस्य भक्त भाविक तसेच राणी सती ट्रस्ट चे अध्यक्ष रामशेठ कयाल आणि विश्वस्थानी मंदिर परिसर व कयाल मंगल कार्यालय उपलब्ध करून दिल्याने इस्कॉन हिंगोली शाखेने त्यांचे ऋण व्यक्त करून भविष्यात ही सहयोग द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.विविध जाती धर्मातील अबाल वृध्द आणि युवक युवतींनी सहभागी होवून अध्यत्मिक सांस्कृतिक आदी उपक्रमांचा लाभ घेतला.