‘प्रहार टीव्ही’च्या बातमी नंतर पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात … आरोपी शुभमअप्पा सराफ मात्र अजुन ही फरारच
हिंगोली (प्रतिनिधी) हिंगोली शहरातील अक्षय इंदोरिया ला केलेल्या मारहाण प्रकरणात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.द.वि. ३२६ सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सदर गुन्ह्यातील फरार आरोपी शुभमअप्पा सराफ सह इतर दोघांनी हिंगोली अप्पर जिल्हा न्यायालयात अटक पुर्व जामीन त्यांच्या वकील मार्फत दाखल केला होता. मात्र 31 ऑगस्ट २०२३ रोजी न्यायालयाने तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. याबाबत ची बातमी ‘प्रहार टीव्ही’ ने प्रकाशित केली .
‘प्रहार टीव्ही’ वर तिघांचा अटकपूर्व जामीन नामंजुर झाल्याची बातमी प्रकाशित झाल्यानंतर हिंगोली पोलिसांनी अटकपूर्व जामीन नामंजुर झालेल्या तिघा आरोपी पैकी संतोष राऊत आणि स्वप्नील परसवाळे या दोघांना ताब्यात घेतले असुन प्रसिद्ध व्यापारी आणि एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता शुभम अप्पा सराफ हा आरोपी बातमी लिहेपर्यंत पोलिसांना काही सापडला नाही.खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुभम अप्पा शिवदास अप्पा सराफ ने बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धाव घेतली आहे .
शुभम अप्पा सराफ ने वकील मार्फत ०५ सप्टेंबर रोजी अटकपूर्व जामीन दाखल केला असुन त्याचे नोंदणी क्रमांक १५०४/२०२३ आहे.मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली पोलीस शुभम अप्पा सराफ चा कसून शोध घेत आहे.पण प्रश्न असा निर्माण होत आहे कि सदर गुन्ह्यातील आरोपी शुभम अप्पा सराफ ने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन वर उच्च न्यायालयाचा निर्णय लागण्यापुर्वी शुभम अप्पा सराफ हा आरोपी पोलिसांच्या हाती लागतो की फरार च राहतो?