शुभम आप्पा सराफ आणि इतर दोघांचे अटकपूर्व जामीन नामंजूर…. पोलीस अटक कधी करणार?

0
815

शुभम आप्पा सराफ आणि इतर दोघांचे अटकपूर्व जामीन नामंजूर…. पोलीस अटक कधी करणार?

हिंगोली(प्रतिनिधी) – हिंगोली शहरातील अक्षय इंदोरीया ला अकोला बायपास येथे नेऊन 15 मे 2023 रोजी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रेखा गुरुदत्त इंदोरीया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गु.र.न. 380/2023 भारतीय दंड विधान च्या 326,342,506,34 सह इतर कलमान्वये आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील तीन आरोपी शुभमअप्पा सदाशिव अप्पा सराफ व इतर दोघांनी अप्पर जिल्हा न्यायालय यांच्याकडे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.या जामीन अर्जावर सुनावणी घेत अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश डी.जी. कांबळे यांनी 31 ऑगस्ट 2023 रोजी निर्णय देत सदरचा जामीन फेटाळला आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे शुभम आप्पा सराफ व इतर दोघांना मोठा झटका बसला असून आता पोलीस अधिकारी शुभम अप्पा सराफ व इतरांना अटक करणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की हिंगोली शहरातील अक्षय इंदोरिया याला 15 मे 2023 रोजी संध्याकाळी अकोला बायपास येथे काही जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती.याप्रकरणी आरोपीनी अक्षय इंदोरिया याला फिर्याद न देण्याची धमकी सुद्धा दिली होती. त्यामुळे अक्षय इंदोरीया हा फिर्याद न देताच दवाखान्यातून घरी निघून गेला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना अक्षय इंदोरिया घरीच आराम करत होता. त्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अक्षय इंदोरिया याला मारहाण केल्याप्रकरणी भा.द.वि.च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यातील तीन आरोपी हिंगोली शहरातील रहिवाशी व व्यापारी शुभम आप्पा सदाशिव आप्पा सराफ,संतोष उपाख्य सोनू सुभाष राऊत,स्वप्नील चंद्रकांत परसवाळे
यांनी अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन त्यांच्या वकिलांमार्फत दाखल केले.

यावेळी आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद सादर करत आरोपी हे निर्दोष असून त्याचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही. आरोपी हा एक व्यापारी आहे आरोपीचे नाव एफआयआर मध्ये सुद्धा नाही . आरोपींकडून काहीही जप्त करायचं बाकी नाही त्याशिवाय गुन्हा दाखल करण्यात खूप उशीर झाला यासह इतर मुद्यांसह युक्तिवाद न्यायालयात केला.
तर सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड संतोष कुटे यांनी आरोपींच्या अटकपूर्व जामीनावर जोरदार आक्षेप घेत दमदार युक्तिवाद न्यायालयात सादर केला. ऍड संतोष कुटे यांनी युक्तिवाद करत सांगितले की आरोपींनी गंभीर गुन्हा केला असून त्यांच्याकडून मारहाण करणारे हत्यार जप्त करणे बाकी आहे.याशिवाय आरोपींकडून इतर आरोपींची माहिती घेणे ही गरजेचा आहे, रक्ताचे नमुने घेणे बाकी आहे, आरोपींना जर जामीन देण्यात आला तर ते साक्षीदार यांच्यावर दबाव आणू शकतात आणि तपासामध्ये व्यत्यय निर्माण करू शकतात त्यामुळे आरोपिंचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात यावा. अशी मागणी न्यायालयात युक्तीवादाद्वारे केली.
अप्पर जिल्हा न्यायालय यांनी सर्व बाजूंचं युक्तिवाद ऐकून अटकपूर्व जामीन वर निर्णय देत सांगितले की तपास अधिकारी यांनी पीडिताचा जबाब नोंदवला असून त्यामध्ये अक्षय इंदोरिया यांनी 9 ऑगस्ट २०२३ रोजी दिलेल्या जबाब सांगितले की पप्पू चव्हाण ने त्याला त्याच्या घरी नेले प्रकाश झाडे, शुभम सराफ,स्वप्नील परसवाळे,सोनु राऊत व इतर दहा-बारा जण त्या ठिकाणी आले त्यांनी पिडीताला मारहाण केली.मोबाईल हुसकावून घेतला. आरोपींकडून पीडितला लाकडाने,पाईप,बेल्ट, बांबू ने बेदम मारहाण करण्यात आली. याशिवाय घटनेचा सविस्तर वर्णन अटकपूर्व जामीन देताना न्यायालयाने नोंदवले. प्राथमिक दृष्ट्या शुभम आप्पा सराफ व इतर दोघांचे नाव पिडीताने दिलेल्या जबाबात नोंदविण्यात आले आहे.पिडिताच्या जबाबचा विचार केला असता असं प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास येत आहे की शुभम आप्पा सराफ व इतर दोघांनी पीडिताला ला मारहाण केली आहे. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना सविस्तर तपास करण्यासाठी आरोपींची कस्टडी आवश्यक आहे ,जेणेकरून आणखीन जे कोणी आरोपी असतील त्यांचे नाव समोर येतील व आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार ही जप्त करण्यात येईल. या व इतर सर्व बाबींचा विचार करता आरोपींना अटकपूर्व जामीन देण्याची आवश्यकता नाही त्यामुळे त्यांचं जामीन नाकारण्यात येत आहे.
न्यायालयाने शुभम अप्पा सराफ इतर दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे आता पोलीस या आरोपींना अटक करतील का असा प्रश्न निर्माण होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा