भुलाबाई ला न भुलनारी मुले

0
3

अगदी काही वर्षांपूर्वी म्हणजे 20 -25 वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक घरामध्ये भुलाबाई हे नाव नवीन नव्हतं. घराघरांमध्ये लहान मुले भुलाबाई ची स्थापना करायचे.भाद्रपद महिन्यात भुलाबाईची स्थापना करून हे मुले वेगवेगळे खेळ,कार्यक्रम आयोजित करायचे. मात्र आता मोबाईल आणि टीव्हीच्या युगात भुलाबाई ही पडद्याआड गेलेली दिसत आहेत.मात्र अजूनही ग्रामीण भाग मध्ये भुलाबाईला मुले विसरलेली नाहीत.आजच्या पिढीला प्रश्न पडला असेल की भुलाबाई कोण आहे? तर भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिलणीचा वेष घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात. भूलोबा म्हणजेच शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती.

भाद्रपद चा महिना आला

आम्हा मुलींना आनंद झाला

पार्वती म्हणे शंकराला

चला हो माझ्या माहेराला

गेल्याबरोबर पाठ बसायला

विनंती करून यश दिला

सर्व मुली गोळा झाल्या

टिपऱ्यामध्ये गुंग झाल्या

प्रसाद घेऊन घरी गेल्या.”

या लोकगीतामध्येच भुलाबाई काय असते? कधी स्थापना होते? याची सर्व कल्पना आपल्याला आली असेल .या गीतांचे गायन भुलाबाई विधीचे वेळी होते. भुलाबाई हा लोककथा गीत महोत्सव आहे. हा महोत्सव भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून ते शरद पौर्णिमेपर्यंत अशा एक महिन्याच्या कालावधीत होतो. सोळा वर्षाखालील मुली हा भुलाबाई महोत्सव साजरा करतात. यामध्ये खाऊवाटप केले जाते यामध्ये शिव शक्तीचा पूजे करिता म्हणजेच भुलाबाई नऊवारी साडी नेसलेल्या आणि भूलजा म्हणजेच शंकर धोतर नेसलेले आणि फेटा बांधले असतात. या लोक खेळाचे मूळ कृषी परंपरेतून आलेले आपल्याला दिसते आणि भुलाबाईचा कोजागिरी पौर्णिमेला उद्यापन करून मुले आनंद साजरा करतात. हिंगोली शहरातील गवळीपुरा भागांमध्ये असंच मुलांनी भुलाबाई ची स्थापना करून भुलाबाईला आम्ही विसरलो नाही असा संदेश दिलेला आहे. यामध्ये कौशिकी नरसीकर, सायली कानबाळे,तनवी गवळी,श्रावणी गवळी, अंजली,सिद्धी, पियू ,चंदा करील,रिया,रामराज नरसीकर व इतर मुलींनी भुलाबाईचा हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा