पुणे (प्रतिनिधी)- नवप्रविष्ट पोलीस शिपाई मूलभूत प्रशिक्षण केंद्र सत्र क्रमांक 64 मधील प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत संचालन समारंभ 22 ऑगस्ट रोजी अशोक मोराळे विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे परिक्षेत्र यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.
राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नानविज ही पोलीस प्रशिक्षण क्षेत्रातील एक नावाजलेली प्रशिक्षण संस्था आहे.या प्रशिक्षण केंद्रामध्ये पोलीस दल व राज्य राखीव पोलीस दलातील जवानांना एकूण नऊ प्रकारचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाते.आतापर्यंत प्रशिक्षण केंद्रात 40,250 पोलीस प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण दिले आहे.राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १ ते १९ या गटातील 136 नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना दिनांक 1-12- 22 पासून प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते.नऊ महिन्याचे खडतर प्रशिक्षण घेऊन सर्व प्रशिक्षणार्थी पास झालेले आहेत.रा. बा. केंडे प्राचार्य रारापोबल प्रशिक्षण केंद्र नानविज यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना शपथ दिली.
सदर प्रशिक्षण सत्रामध्ये प्रशिक्षणार्थी यांना पारंपरिक प्रशिक्षणासोबत आधुनिक प्रशिक्षण भारतीय सैन्य व निमलष्करी दलामध्ये बीपीईटी पीपीटी बेसिक कमांडो नाईट गोळीबार सराव आधुनिक शस्त्रांचे प्रशिक्षण दिले आहे विविध कायद्यांचे प्रशिक्षण दिले.पोलीस प्रशिक्षणार्थी यांना प्राचार्य रा बा केंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व प्रशिक्षक यांनी अतिशय मेहनत घेऊन खडतर प्रशिक्षण दिले आहे.प्रशिक्षण काळात लीडरशिप मानसिक ताण तणाव व व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयांचे तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.चिरंजीव प्रसाद अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई अशोक मोराळे विशेष पोलीस महानिरीक्षक रारापोबल पुणे अभिषेक त्रिमुखे पोलीस उप महानिरीक्षक रारापोबल मुख्यालय मुंबई यांचे सदर प्रशिक्षण काळात मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
दीक्षांत संचलन समारंभाकरिता पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अमलदार प्रशिक्षण केंद्राचे परिसराच्या गावातील राजकीय मान्यवर पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी प्रशिक्षणार्थी यांचे नातेवाईक यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रमुख अतिथी अशोक मोराळे विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे परिक्षेत्र यांनी भाषणामध्ये प्रशिक्षणार्थी यांनी अतिशय उत्कृष्ट संचालन केले बद्दल अभिनंदन केले.प्रशिक्षणा दरम्यान मिळविलेले ज्ञान व शिस्त सेवानिवृत्ती पर्यंत कायम सोबत ठेवण्याचा सल्ला दिला.पोलीस दलाचे ब्रीदवाक्य “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” याप्रमाणे कर्तव्य बजावणे बाबत व कर्तव्य करीत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा व प्रामाणिकपणे कर्तव्य करण्याचा सल्ला दिला.