नांदेड (प्रतिनिधी) – शैक्षणिक ,राजकीय,सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील उज्ज्वला तांभाळे पाटील यांना
15 ऑगस्ट 2023 रोजी नांदेड येथे मीमांसा फाऊंडेशन, दै.समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह, ह्युमन राईट्स फाऊंडेशन व मीडिया – पोलीस सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने “कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार 2023” ( वर्ष 14 वे) यांचा “सावित्रीबाई फुले शिक्षण भूषण पुरस्कार” मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
उज्ज्वला तांभाळे पाटील या वसमत तालुक्यात शैक्षणिक विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. श्री हट्टेश्वर ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ करंजाळा या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून कार्य करत आहे. संस्थेच्या २ माध्यमिक शाळेच्या माध्यमाने ग्रामीण भागातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे . याशिवाय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम राबवले . ग्रामीण भागातील महिलांना साक्षर करण्यासाठी साक्षरता अभियान राबवले .
राजकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन अनेक पदे भूषवले . या दरम्यान मिळालेल्या संधी चे सोनं करत नागरिकांना सुविधा मिळाव्या यासाठी अनेक विकास कार्य केले .शेतकरी,महिला,मागासवर्गीय घटकांसाठी उज्ज्वला तांभाळे पाटील यांनी मोठे कार्य केले .
उज्ज्वला तांभाळे पाटील यांनी केलेल्या या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेत उज्ज्वला तांभाळे पाटील यांना प्रतिष्ठित असे “सावित्रीबाई फुले शिक्षण भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आले .वसमतच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवलेल्या उज्ज्वला तांभाळे पाटील यांना मिळालेल्या पुरस्कार मुळे सर्व स्तरावरून उज्ज्वला तांभाळे पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .
या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय डॉ. शशिकांत महावरकर (विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परीषेक्ष नांदेड), कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सद्गुरु सदानंदजी स्वामी महाराज (मठाधिपती) (श्रीक्षेत्र रामलिंगेश्वर रामलिंग मुदगड निलंगा जि.लातूर), विशेष उपस्थिती अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी नांदेड) व प्रमुख अतिथी श्रीकृष्ण कोकाटे (पोलीस अधीक्षक नांदेड), डॉ. महेश कुमार डोईफोडे (आयुक्त मनपा नांदेड),श्री बापू दासरी (सहा. आयुक्त समाज कल्याण नांदेड) इ मान्यवर उपस्थित होते.