उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधींनी पटकावला आयर्नमॅनचा किताब

0
191

हिंगोली जिल्हा प्रशासनात पहिला अधिकारी ठरला आयर्नमॅनचा मानकरी

कोल्हापुर (प्रतिनिधी) – हिंगोली जिल्हा प्रशासनातील कर्तबगार क्रीडाप्रेमी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कोल्हापूर येथे झालेल्या जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या आयर्नमॅनच्या स्पर्धेत प्रथम प्रयासातच अद्वितीय यश संपादन केले आहे. यामुळे ते हिंगोली जिल्हा प्रशासनात आयर्नमॅनचा ‘किताब पटवणारे पाहिले अधिकारी ठरले आहेत.

 

हिंगोली जिल्हा प्रशासनातील कर्तबगार तथा क्रीडाप्रेमी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारामध्ये सहभाग घेऊन त्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. पण यापेक्षा काहीतरी वेगळे करून दाखवण्याच्या त्यांच्या तळमळीने त्यांना राहू दिलं नाही. म्हणून त्यांनी मनातील आयर्नमॅन होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी प्रशासनातील कामकाजांना न्याय देत स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशाने रिकाम्या वेळेचा सदुपयोग करत पूर्ण जिद्दीने व चिकाटीने सराव करून कोल्हापूर येथे रविवार 02 ऑक्टोबर रोजी आयोजित जगातील सर्वात कठीण हाल्फ आयर्नमॅनच्या स्पर्धेत सहभाग घेतला.

स्पर्धेकरिता संबंध भारतामधील तब्बल 750 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सहभागी स्पर्धकांना 2 किमी पोहणे, 90 किमी सायकलिंग करणे आणि 21 किमी धावण्याकरिता 10 तासांचा निर्धारित वेळ देण्यात आला होता. यात उमाकांत पारधी यांनी 1 तास 7 मिनिटात 2 किमी पोहणे, 3 तास 9 मिनिटात 90 किमी सायकलिंग आणि 2 तास 48 मिनिटात 21 किमी धावण्याचा विक्रम करून केवळ 7 तास 56 मिनिटात स्पर्धा पूर्ण करून हाल्फ आयर्नमॅनचा ‘किताब आपल्या नावे करून घेतला. त्यांच्या ह्या अद्वितीय यशामुळे ते हिंगोली जिल्हा प्रशासनात हाल्फ आयर्नमॅनचा ‘किताब पटकवणारे पाहिले अधिकारी ठरले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा