गोळीबार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास हिंगोली पोलिसांतर्फे 25000 रुपयांच्या बक्षीस जाहीर

0
320

हिंगोली-(प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर जिल्हा परिषद हिंगोली परिसरात एक ऑगस्ट रोजी गोळीबार करण्यात आला.याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पाच आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील तीन आरोपीना पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी अजूनही फरार आहेत. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने तीन पथके तयार करून या आरोपींचा शोध घेतला जात आहे . मात्र दोन्ही आरोपी पोलीस पथकाला गुंगारा देत आहेत.

आरोपींना पकडण्यासाठी हिंगोली पोलिसांनी वेगळी शक्कल लढवत आरोपी अक्षय गुरुदत्त इंदोरिया व ओम गणेश पवार यांची माहिती देणाऱ्या पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आरोपींची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. याबाबतची माहिती दिनांक 4 ऑगस्ट रोजी जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली यांनी प्रेस नोट काढून दिली आहे.
आरोपींची माहिती या क्रमांकावर देण्यात यावी
9011320100, 9923104521

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा