हिंगोली(प्रतिनिधी)- हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील तीन ते चार दिवसापासून सतत पाणी पडत आहे.यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रमाण वाढलेला आहे. जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील अनेक परिसरातील घरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे.आखाडा बाळापूर येथील गोयंका नगर भागातील शिवचरण गोयंका यांच्या घरासमोर तर तब्बल चार ते पाच फिटपर्यंत पाणी साचल्याची प्रतिक्रिया प्रहार टीव्हीला शिवचरण गोयंका यांनी दिली.यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आखाडा बाळापूर ग्रामपंचायत याकडे त्वरित लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.