शासनाची फसवणूक करून त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कार्यवाही होण्यासाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण

0
354

मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई येथील समाज सेवक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता रघुनाथ निरंजन खजूरकर यांनी मुंबई येथील आजाद मैदानावर विविध मागण्यासाठी बुधवार पासुन उपोषण सुरु केलं आहे.रघुनाथ खजूरकर यांनी आरोप केला आहे कि उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद मधील आरोग्य कर्मचारी जवळजवळ वीस वर्षे झाले सरकार नियमानुसार त्यांना मुख्यालय राहण्याचा शासन आदेश असून सध्या सुद्धा तिथे राहत नाही,वीस वर्षापासून घर भाडे घेतात,याप्रकरणाची माहिती मॅगी सात वर्षापासून खजूरकर हे त्यांच्या ग्रामपंचायत, सोलापूर आरोग्य विभाग, पुणे आरोग्य विभाग, आरोग्यभवन आयुक्तालय विभाग मुंबई ,मुख्यमंत्री सचिवालय दालन,आरोग्यमंत्री विभाग मंत्रालय, यांना सर्वांना अनेक वेळा पत्रव्यवहार पोस्टाद्वारे, मेलद्वारे,प्रत्यक्ष अनेक वेळा भेट देऊन अर्ज केलेले आहेत, तरी संबंधितांवर आज पर्यंत कुठल्या हि प्रकारची कार्यवाही झालेली नाही, वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कार्यवाही करत नाहीत,गावामध्ये आरोग्य उपकेंद्र ज्या ठिकाणी आहे, ती जागा खूप मोठी आहे तरी तिथे सध्या २ खोल्या स्नान गृह शौचालय (१ बीएचके ) एवढे मोठी खोली असून सर्व सुविधा आहेत तरीही , त्यामध्ये त्यांचे कर्मचारी मुद्दामहून तिथे राहण्यास जात नाहीत, सध्या ते धुळकात पडलेलं आहे .

या प्रकरणी अनेक वेळा आंदोलन करून सतत पाठपुरावा करून सुद्धा टाळाटाळ करण्यात आली . यामुळे बुधवार पासुन विविध मागण्यासाठी आझाद मैदान येथे रघुनाथ खजुरकर यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.रघुनाथ खजूरकार करत असलेल्या उपोषणाला समाजातील विविध घटकातील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे .

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा