हिंगोली(प्रतिनिधी) – हिंगोली चे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षकाचा पदभार स्वीकारल्यानंतर एकीकडे कामचुकार व कसूरदार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे तर दुसरीकडे पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना आपला कुटुंब मानत त्यांच्या अडीअडचणी समस्या सुद्धा सोडवत आहेत. जी श्रीधर यांनी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी 4 मे रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे दरबाराचे आयोजन केले होते. या दरबारात अधिकारी व अंमलदार यांच्या प्रश्नांचे व समस्यांचे जागेवर निरसन करण्यात आले. त्यामुळे अधिकारी अंमलदार यांच्यातून समाधान व आनंद व्यक्त होत आहे.
पोलीस दलातील सेवा कठोर परिश्रमाची समजली जाते. पोलीस म्हणून समाजात काम करताना दैनंदिन कामाच्या व्यापासोबतच कामाचा ताणतणाव मोठा असतो.
पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या सेवेत त्यांच्यासाठी सर्व सुविधा व त्यांचे असलेल्या आणि अडचणींचे तात्काळ समाधान व सहज व्हावे आणि अडचणी नसतील तर पोलीस अधिकारी व अंमलदार अधिक कार्यक्षमपणे कर्तव्य बजावू शकतात.
म्हणून पोलीस अधिकारी व अंमलदार यांना असलेल्या समस्या व अडचणी एकत्रित जाणून घेऊन त्यावर समाधानासाठी शक्य ते सर्व उपाययोजना करण्याच्या उद्देशाने हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्हा पोलीस दलातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी 4 मे रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे दरबाराचे आयोजन केले होते.
सदर दरबारात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक, कार्यालयीन अधीक्षक व इतर पोलीस अधिकारी कार्यालयीन स्टाफ व सर्व पोलीस ठाणे तसेच शाखेतील पुरुष व महिला पोलिसांना मोठ्या संख्येने हजर होते.
दरबारात पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सर्व उपस्थित अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या समस्या आणि अडचणी विचारून अधिकारी व अंमलदार यांनी सांगितलेल्या अडचणींप्रमाणे तात्काळ त्याबाबत पुढील उपाययोजना व कार्यवाही बाबत आदेश देऊन अधिकारी व अंमलदार यांनी मांडलेल्या समस्या आणि अडचणींपैकी अधिकाधिक समस्यांचे निराकरण तात्काळ केले.त्यामुळे संबंधित अधिकारी व अंमलदार यांचा आनंद द्विगुणीत झाला.
उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी दरबाराचे आयोजन केले म्हणून आनंद व समाधान व्यक्त केले.