नीति सरकार विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी मालटेकडी आणि पूर्णा रेल्वे स्थानकांचे निरीक्षण केले

0
231

नांदेड (प्रतिनिधि)- आज दिनांक 15 एप्रिल, 2023 रोजी श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी मालटेकडी रेल्वे स्थानक आणि पूर्णा रेल्वे स्थानकांचे निरीक्षण केले.
प्रथमतः त्यांनी मालटेकडी रेल्वे स्थानकाला भेट दिली, ज्यात त्यांनी मालटेकडी रेल्वे स्थानकावरील महिला प्रतीक्षालय, सामान्य प्रतीक्षालय ची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मालटेकडी येथील माल धक्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथे उपस्थित मालवाहतूक गुत्तेदारांशी चर्चा केली. यात त्यांना काम करतांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

त्यानंतर श्रीमती सरकार यांनी पूर्णा रेल्वे स्थानकाला भेट दिली. ज्यात प्लातफोर्म क्र. 4 वरील प्रतीक्षालया ची पाहणी केली. तसेच तेथील टी स्टोल ची पाहणी केली. पूर्णा येथील मेडिकल रिलीफ वेन (एम.आर.व्ही.) आणि अक्सिडेंट रिलीफ ट्रेन (ए.आर.टी.) ची पाहणी केली. तेथील कर्मचार्‍यांशी चर्चा केली.

त्यानंतर श्रीमती सरकार यांनी पूर्णा रेल्वे कोलोनी ला भेट दिली. क्रू लोबी, आर.पी.एफ. बेरेक, महिला आर.पी.एफ.बेरेक ला भेट दिली. त्त्यात योग्य सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
हा पाहणी दौऱ्यात श्रीमती सरकार यांच्या सोबत श्री आर.के.मिना, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड आणि इतर विभागीय रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा