हिंगोली (प्रतिनिधी)- हिंगोली शहरातील गांधी चौक भागात असणारे हिंद प्रिंटिंग प्रेस दुकानाला आज चारच्या सुमारास अचानक आग लागली.या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाल्याची चर्चा आहे. हिंगोली नगरपरिषद अग्निशमन दल च्या वतीने ही आगविण्यात विझवण्यात आली.या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची चर्चा आहे.यावेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणे गर्दी झाली होती. आज रविवारची सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणे बाजारामध्ये गर्दी दिसून आली .ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही.
Video Player
00:00
00:00