मुंबई- (प्रतिनिधी)- “चौथास्तंभ पुरस्कार ” हा अप्रतिम मीडिया तर्फे देण्यात येणारा पत्रकारितेतील राज्यस्तरीय पुरस्कार मुंबईत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटर
मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित शानदार सोहळ्यात स्थानिक विकास वृत्त या गटात एनडीटीव्ही प्रतिनिधी कन्हैया खंडेलवाल यांना प्रदान करण्यात आला. कन्हैया खंडेलवाल यांनी एनडीटीव्ही च्या माध्यमातून मराठवाड्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली विशेषतः स्थानिक विकास विकास विषयी त्यांचे भरीव योगदान आहे. कन्हैया खंडेलवाल यांना यापूर्वी अनेक पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा पु.ल. देशपांडे राज्यस्तरीय पुरस्कार,सिंगापुर येथील मीडिया प्रोफेशनल ऑफ द इयर पुरस्कार व इतर अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांचा समावेश आहे.कन्हैया खंडेलवाल यांनी चौथा स्तंभ पुरस्कार त्यांचे वडील स्व.सत्यनारायण घिसुलाल खंडेलवाल यांना समर्पित केला आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यासपिठावर
विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक
अभिजीत पाटील,
अभिनेते मंगेश देसाई, निमंत्रक रणजीत कक्कड उपस्थित होते.
या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जेष्ठ संपादक, पत्रकार यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सविस्तर प्रास्ताविक अप्रतिम मीडिया चे संचालक डॉ अनिल फळे यांनी केले.तर आभार प्रदर्शन निमंत्रक विवेक देशपांडे यांनी केले.
यावेळी विविध मान्यवर,
पुरस्कारार्थिंचे कुटुंबीय,स्नेही, मोठ्या संख्येने उपस्थित होते