हिंगोली लोकसभा वंचित चे उमेदवार डॉ. बी डी चव्हाण यांचे पाय खोलात…रिपब्लिकन सेना वंचितच्या उमेदवाराचे काम करणार नाही – किरण घोंगडे

0
196

हिंगोली (प्रतिनिधी) – लोकसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.हिंगोली लोकसभेची निवडणूक २६ एप्रिल रोजी होणार असुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नागेश पाटील आष्टीकर तर शिवसेना शिंदे पक्षाने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.या नंतर सर्वांच्या नजरा वंचीत बहुजन आघाडी कडे लागल्या होत्या. वंचित बहुजन आघाडीने योग्य उमेदवार दिल्यास रिपब्लिकन सेना च्या मदतीने हिंगोली लोकसभेवर वंचित चा झेंडा फडकू शकतो असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत होते. हिंगोली लोकसभेत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची मोठी ताकद आहे.
अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी ने नांदेड चे डॉ बी डी चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ बी डी चव्हाण यांच्या उमेदवरीने जिल्ह्यात उलट सुलट चर्चना उधाण आले आहे.या प्रकरणी आम्ही आंबेडकरी चळवळीचे नेते तथा रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी डॉ बी डी चव्हाण यांच्या उमेदवारीवर अत्यंत तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले कि आज मीतिला आम्ही वंचित बहुजन आघाडी किंवा महाविकास आघाडीच्या कोणत्याच उमेदवाराचे काम करणार नाही. डॉ बी डी चव्हाण च्या रूपात वंचित बहुजन आघाडी ने “ओबीसी उमेदवार दिला असला तरी ओबीसी मोर्चा ने एड रवी शिंदे यांच्या रुपाने ओबीसी उमेदवार दिल्या असल्याचे सांगितले.
परस्पर लढतीत वंचीतचा फुसका बार होऊ शकतो.

आता पर्यंत बहुजन समाज पक्ष,शिवसेना आणि आता निवडणुकीच्या तोंडावर तिकीट मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला आहे. निवडणूक लढवतात आंबेडकरी मतदान घेतात आणि नंतर प्रस्थापित पक्षात जातात हा इतिहास आहे अशा उमेदवारावर मतदार कसा विश्वास करणार असा प्रश्न उपस्थित केला.डॉ बी डी चव्हाण पाच वर्ष आपले तोंड दाखवत नाही आणि निवडणूक आली की उगवतात अशी खरमरीत टीका घोंगडे यांनी केली. रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेने तर्फे अमरावती येथून लोकसभा निवडणूक लढवत आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी दोघांनीही आपली उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. याचा निषेध करत रिपब्लिकन सेना सुद्धा आता वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणार असल्याचे प्रतिक्रिया किरण घोंगडे यांनी दिली. हिंगोली लोकसभेत रिपब्लिकन सेनेची मोठी ताकद आहे बि डी चव्हाण यांचा विरोध रिपब्लिकन सेना करत असेल तर चव्हाण यांचे पाय खोलात असल्याची चर्चा केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा