डॉ. श्रीनिवास कंदी यांची वैद्यकीय नोंदणी रद्द करून कंदी हॉस्पिटल चा परवाना रद्द करा – छावा दल ने निवेदनाद्वारे केली मागणी

0
233

हिंगोली -(प्रतिनिधी) – हिंगोली शहरातील नामवंत वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर श्रीनिवास कंदी यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर हिंगोली जिल्हा शल्य चिकित्सक यांना छावा दल या संघटनेच्या वतीने निवेदन देऊन डॉक्टर श्रीनिवास कंदी यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.छावा दल ने दिलेल्या निवेदनात खालील मुद्दे मांडण्यात आले. हिंगोली शहर येथील डॉ. श्रीनिवास कंदी हे वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा कार्य करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.डॉ श्रीनिवास कंदी यांनी दिनांक ०४-०७- २०२३ रोजी त्यांच्या हिंगोली येथील कंदी हॉस्पिटल येथे इतर गुन्ह्यातील आरोपी सत्यम नरसिंह देशमुख याच्या शरीरास बोध करून त्या ठिकाणी ब्लेडने गंभीर दुखापत करून आपल्या व्यवसायाचा बेकायदेशीर वापर करून गुन्ह्याचे स्वरूप गंभीर करण्यासाठी व खोटा पुरावा तयार करण्यासाठी गंभीर जखमी केले आहे. डॉ श्रीनिवास कंदी यांनी केलेल्या या गैरकृत्य त्याप्रकरणी त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 कलम 195,326,34 अन्वये हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे ज्या डॉक्टरचं कर्तव्य व्यक्तीचे प्राण वाचवायचे आहे त्या कर्तव्या विरोधात वागून डॉक्टर श्रीनिवास कंदी यांनी सत्यम नरसिह देशमुख या इतर गुन्ह्यातील आरोपीला वाचवण्यासाठी आणि दुसऱ्या निर्दोष व्यक्तीला फसवण्यासाठी खोटा गंभीर जखमा तयार करून त्यास मदत केली. यावरच डॉक्टर श्रीनिवास कंदी थांबले नाही तर त्यांनी सत्यम देशमुख या इतर गुन्ह्यातील आरोपीला सांगितले की पोलीस आल्यावर सांग की मला पण पोटावर व डोक्यावर व हातावर हत्याराने मारले म्हणून अशाप्रकारे खोटं सांगण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःही या गुन्ह्यात सहभागी झाले.
इंडियन नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या मेडिकल इथिक्स अँड कंडक्ट चे नियम 7.9 नुसार गरज नसताना ऑपरेशन करणे हे कायद्या चा भंग आहे.
डॉक्टर श्रीनिवास कंदी यांनी अनेक प्रकारचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले यामुळे अनेक निर्दोष लोकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या मेडिकल एथिक्स अँड कंडक्टचे नियम 7.7 नुसार खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे गैर कायदेशीर आहे.

याशिवाय डॉक्टर श्रीनिवास कंदी यांनी अनेक प्रकारचे गुन्हे केले असून त्यांच्या या गुन्ह्यामुळे निर्दोष लोकांना,रुग्णांना भयंकर त्रास सहन करावा लागला आहे. डॉक्टर श्रीनिवास कंदी चालवत असलेल्या खोट्या आयपीसी 307 ची फॅक्टरी ही त्वरित बंद करणे गरजेचे आहे.डॉ श्रीनिवास कंदी हे अनेक गैरकृत्य करत असल्याच्या तक्रारी या येत असतात. मात्र त्यांच्या पैसे आणि वजन वापरून ते यामधून निसटून जातात .
डॉक्टर श्रीनिवास कंदी यांच्या कंदी हॉस्पिटलचा परवाना तात्काळ रद्द करावा, डॉक्टर श्रीनिवास कंद यांचा वैद्यकीय नोंदणी क्रमांक रद्द करण्याची शिफारस नॅशनल मेडिकल कौन्सिल महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांच्याकडे करावी.

डॉ श्रीनिवास कंदी यांनी आता पर्यंत दिलेले MLC रजिस्टर ताब्यात घेऊन डॉ श्रीनिवास कंदी यांनी आता पर्यंत दिलेले खोटे MLC ची चौकशी करून गुन्हा दाखल करावा. अशी मागणी छावा दल ने जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदनावर विनायक भिसे पाटील छावा दल संस्थापक अध्यक्ष, एडवोकेट आर टी शिंदे छावा दल जिल्हाध्यक्ष हिंगोली, पिंटू जाधव,विजय शिंदे, मधुकर ढवळे,रवी इंगळे, संतोष गरड, शिवाजी गरड,नारायण गरड, रामेश्वर मापारी, सचिन वसु, राहुल,विकास, प्रकाश वामन, सोनू देशमुख इत्यादी यांच्या सह्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा